Tuesday, November 25, 2008

राज्य

डि एस के विश्व मधे रहाणे म्हणजे कसे निसर्गाच्या सानिध्यात रहाणे.  

दोन बाजुला दुरवर पसरलेल्या डोंगररांगा, पुणे शहराचे दिसणारे विहंगम दृश्य, समोरील सिंहगड, खडकवासल्याच्या जलाशयाचे भान हरपुन टाकणारे दर्शन. चव्हाण बागे कडुन वर चढणारा मनमोहक नागमोडी घाट , दुतर्फा गुलमोहरांनी गच्च बहरलेला. येथे आले की कस बाहेरील जगाशी असणारा संपर्क जणु तुटुन जातो.    

Tuesday, July 29, 2008

रक्त दान शिबिर

जेष्ठ नागरिक संघानी गेल्या रविवारी रक्त दान व रक्त गट चाचणी शिबिर आयोजित केले होते। त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळाला



Monday, July 14, 2008

आम्ही पण वारकरी आहोत बर का !

बच्चेमंडळीची धमाल.

Monday, June 30, 2008

मेघमल्हार





्मेघमल्हारचा भुमीपुजनाचा समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा झाला.

Sunday, June 29, 2008

जेष्ठ नागरीक संघ








जेष्ठ नागरीक संघाला आता त्यांची हक्काची जागा मिळाली आहे. चंद्रमा ’आय’ च्या तळमजल्याशी नवीन जागा श्री. डी एस कुलकर्णी यांनी उपलब्ध करुन दिली. आज या त्यांच्या जागेत अनेक कार्यक्रम होवु लागले आहेत. नव्या नव्या उपक्रमांचे बेत आखले जात आहेत.

श्री. शशिकांत पाचवडकर - अध्यक्ष, अविनाश भालेराव - सचिव, श्रीकांत साळवेकर - उपाध्यक्ष, भुजंग कुलकर्णी - कोषाध्यक्ष, क्रांतीसिंग आठवले या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती जेष्ठ नागरीक संघाचे कार्य अगदी जोरात , जोमाने सुरु आहे.

"गुलमोहर" या जेष्ठांनी जेष्ठांसाठी चालवलेल्या जेष्ठांच्या मासीक पत्रिकेत आपले मनोगत लिहीतांना श्री अविनाश भालेराव लिहीतात " आपल्या, संघातील सभासदांच्या विचारमंथनातून सामाजीक प्रश्नांची, जेष्ठांच्या समस्येची उकल होण्यासाठी चालना मिळेल, चर्चा घडतील. जेष्ठ नागरीक संघ म्हणेजे थीक टॅंक असे म्हटले जाते हा थीक टॅंक खऱ्या अर्थाने कार्यान्वित होईल, पण हे सारे घडावे कसे ? त्यासाठी पहिली गोष्ट म्हणेजे आपण एकत्र आले पाहीजे. ही संधी आपल्याला मासिक बैठकीच्या निमित्याने मिळते"

या महिन्यातील मासीक बैठकीचा विषय होता " महाभारतातील प्रसंग " वक्ते श्री. भा.पु. टिळक. त्यांनी आपल्या भाषणात अनेक प्रसंग खुलवुन सांगीतले.

नेहमी प्रमाणॆ आधी ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले त्यच प्रमाणे या महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.

जेष्ठ नागरीक संघानी ६ जुलै रोजी साधु वासवानी मिशनच्या के.के. आय इन्स्टीट्यूटच्या सहाकार्याने "नेत्रतपासणी शिबीर आयोजीत करण्याचे ठरविले आहे.

मध्यवर्ती जेष्ठ नागरीक संघ्टना, पूणे, या पुणे शहरातील जेष्ठ नागरीक संघाच्या संघटनेशी यांनी संलग्नता घेतली आहे. या संस्थेमार्फत पुणे शहरात अनेक उपक्रम, कार्यक्रम, चर्चासत्रे, स्पर्धा आयोजीत केल्या जातात, तसेच "प्रज्योत" ही माशीक पत्रिका प्रकाशीत केली जाते. या सर्वाचा लाभ आता विश्व मधील सभासदांना मिळु शकेल.

आपली हक्काची जागा तर यांना मिळालीच पण अजुनही त्यांना अडीअडचणीचा सामना करावा लागतोय. खर म्हणाजे आयुष्यभरची लढाई लढल्यानंतर जेष्ठांना आता सर्वकाही विनासायास ,सुरळीत मिळायला पाहीजे. पण नाही. तसे होत नाही. यांना अजुनही आपल्या हक्काच्या जागेत मुलभुत गरजा मिळवण्यापासुन ही वंचीत ठेवले जाते. अजुनही या जागेत त्यांना वीजपुरवठा मिळालेला नाही. झारीतील शुक्राचार्य अनेक असतात. आतातरी त्यांना अडवणुक करु नये.


जेष्ठ नागरीक संघाला माझ्या शुभेच्छा.









Wednesday, June 25, 2008

Tuesday, June 3, 2008

श्री. निखिल फाटक

येथे अनेक नामवंत, प्रतिभाशाली कलावंत रहातात. सुप्रसिद्ध तबलावादक श्री. निखिल फाटक हे या पैकी एक. श्री. राहुल देशपांडेंना गायनात साथ करतांना त्यांना आपण पाहीलेच असेल. अनेक मोठ्यामोठ्यांचे गाण्यात त्यांनी वादनांने अधिक रंग भरले आहेत.

शर्वरी जमेनीस व ऋजुता पाध्ये यांना कथ्थक नॄत्याला तबल्यावर साथ करतांना श्री. निखिल फाटक.




हा विडियो जपानचे श्री. शिंजी यांनी घेतला आहे व त्यांच्या परवानगीने मी येथे देत आहे.

डी.एस.के विश्व शाळा


येथे साकारतेय ऐक शाळा, लवकरच येथे एक रुग्णालय ही बांधण्यात येणार आहे.

हा देखील एक असुयेचा विषय

सायंतारा क्लब हाऊस.



बंगला घेतला असता तर ?

हेवा, मत्सर, आणि असुया

हेवा, मत्सर आणि असुया या शुद्र मानवी भावनेंचा मनाला स्पर्श देखील होवु नये असे जरी कितीही मनात वाटत असले तरी "मेघमल्हार" मधे खडकवासलाच्या दिशेला घर घेतलेल्यांना हे जे विहंगम दृश्य सतत डोळ्यासमोर दिसणार आहे त्या बद्द्ल नाही म्हटले तरी थोडीशी,जर्रासी जलन वाटतेच.

पण त्यांनांही पुर्वेकडचा हा सुर्योदय, हा बहरलेला तामण, हे पुणे दर्शन बघायला पलीकडे यावेच लागणार आहे ना.



Monday, June 2, 2008

मेघमल्हार

डिएसके विश्व मधे फेस ५,६,७ चे बुकिंग ३१ मे रोजी सुरु झाले आणि एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की जवळ जवळ सर्वच घरे केवळ या दोनच दिवसात लोकांनी बुक केली असावीत.

जगातील सर्वात सुंदर रस्ता





जगातील सर्वात सुंदर रस्ता मला माझ्या घराकडे घेवुन जातो. दुतर्फा काय गुलमोहर बहरुन राहीलाय.

Friday, April 4, 2008

स्वागतम. या हे विश्व आपलेच आहे.


ह्या विश्वात आपले स्वागत आहे.

येथे राग, रुसवे, भांडण ह्यास नसावा थारा. हवे फक्त प्रेम, आनंद, समाधान आणि सुख.

नको दुरावा नको संताप, निव्वळ असावी फक्त आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास

हे विश्वची माझे घर

तथास्तु

Saturday, November 24, 2007

घराला घरापण देणारी माणसे

"आम्ही आलो, आम्ही पाहिले, आम्ही घेतले. घर घेणे एवढे सोपे होते तर ! मग त्या साठी २०-२२ वर्षे वाट बघण्यात का वाया घालवली ? एकमेव कारण त्या काळी डि.एस.के. विश्व नव्हते हेच असु शकते.
२५ डिसेंबर २००४ चा नाताळात आमच्या साठी सांताक्लॉज भेटवस्तु घराच्या रुपाने घेवुन आला. अनेक वर्षे मी क्रेडीट कार्डाच्या मोहजालात फसुन कर्जबाजारी अवस्थेत गुजारा करत होतो. डोके वर काढायलाही मिळत नव्हते. ऍरीयर्स मिळाले, पहिल्यांदा सर्व कर्जे फेडुन टाकली . दिवाळीत बायकोनी सर्वांसमवेत मसुरीला जाण्याचा बेत आखला, तो टाळण्यासाठी मी तिला खोटेखोटे सांगितले कि मी पुण्यात घर घेण्याचा विचार करतो आहे. (तसा माझा हा विचार अगदी कॉलेज च्या दिवसांपासुनचा होता, पण धीर होत नव्हता ), मला काय ठावुक ती ही कल्पना लगेचच उचलुन धरेल. मसुरीला ही जावु व घर ही घेवु, ही तिची प्रतीक्रिया. बहुतेक आपला नवरा रॉकफेलर आहे असा तीचा गैरसमज असावा. मसुरीवरुन परत आल्यावर पुण्यात घर घेण्याचा विचार बळकवला. एके रविवारी सर्व सगेसोयरे समवेत पुण्याला घर शोधण्याच्या मोहीमेला निघायचे ठरले, नेहमीप्रमाणेच एकएक गळत गेला. आमचा मग मुडच गेला, म्हटले जावु दे नन्नाचाच पाढा , पनवतीच, लागली आहे. आपणही नकोच जावु या. पण नियतीच्या मनात तसे नव्हते. पहाटे चार वाजता अचानक मला जाग आली, बायकोला उठवुन लगेचच पुण्याला निघालो.
त्या आधी दोन एक वर्षे डि.एस.के. विश्व च्या जाहीराती मनाला भुरळ घालत होत्या. घर येथेच घेण्याचे हे मी , जागा न बघताही मनाशी पक्के ठरवले होते. पण दुर कोठे जाणार करुन तीचा विरोध होता. मग मी एक छोटीसी गंमत केली. शिवाजी नगर वरुन जागा पाहाण्यासाठी पाषाण सुस रोड, वगैरे विभागात रिक्षाने फेरफटका मारला. परिसर बघुनच ती नाराज झालेली बघुन हळुच रिक्षा डि.एस.के.च्या कार्यालयाकडे वळवली.
त्यानंतर जे काही झाले ते स्वप्नवतच होते. त्यांच्या गाडीतुन डि.एस.के. विश्व मधे जाणे, प्रथमदर्शनी त्याच्या प्रेमात पडणे, येथला निसर्ग, वारा, मोकळेपणा याचा आस्वाद घेत, घर असावे तर येथेच नाहीतर कुठेच नको याची खुणगाठ मनाशी बाळगत, डि.एस.के.च्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीने सुखावत जावुन, मस्त शेजार निवडत, घर पसंत करणे. मग त्या रात्री अंगावरच्या कपडयानिशी एका नातेवाईकांकडे रात्र गुजारली. दुसऱ्या दिवशी आईवडिलांना चेकबुक घेवुन ,पसंत केलेली जागा दाखवण्यासाठी, व त्यांचा विचार घेण्यासाठी पुण्याला बोलावले. धीर अजिबात धरवत नव्हता, कधी आपल्या मालकीची , हक्काची जागा होते असे झाले होते.
गंमत म्हणजे खिश्यात व खात्यात एकही दमडी पैसा नव्हता. कुठुन तरी ११,००० घेवुन दुसऱ्या दिवशी खात्यात भरले. एका बॅंकेत गृहकर्जासाठी गेलो, पण माझे त्याच बॅंकेत खाते असले तरी, व पगार तेथेच जमा होत असतांना सुद्धा, बचत खात्यात तुमची बचत नाही, सांगत त्यांनी कर्ज देण्यास नकार दिला, पगारातुन परस्पर जिवन विमा, ऐच्छीक प्रोव्हीडंड फंड मधे मी मोठी गुंतवणुक करत आहे हीच माझी बचत, या युक्ती वादावर बाईचा विश्वास नव्हता. निराश मनाने मी काय करावे याचा विचार करु लागलो, हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळतो की काय ? अर्थात शेवटचा फंडा तुन पैसे उचलणे हा पर्याय उपलब्ध होता, पण. डि.एस. के.च्या कार्यालयातुन दुरध्वनी आला, ताबा केव्हा घेता याची चौकशी करण्यासाठी, त्यांना मी परिस्थीती सांगीतली. त्यांनी धीर देत मला सर्व कागदपत्रे त्यांना फॅक्स करायला सांगीतले. आयसीआयसीय बॅंक माझ्या साह्यास आली, ह्या बॅकेमधुन मला त्यांनी गृहकर्ज मिळवुन दिले. आणि अश्या रितीने नाताळात आम्ही गृहप्रवेश केला. आयुष्यभरचे स्वप्न साकार केल्या बद्दल डि.एस.के व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. "

घराला घरापण देणारी माणसे

प्रिय डी एस के ।
आपण केवळ घराला घरापण देणारी माणसे नाहीत , आपण त्याच बरोबर आम्हाला एक नवे आयुष्य देखील दिलेत। स्वताचे घर असावे ही भावना किती सुखद असते , ते सुख केवळ आपल्यामुळेच मला लाभले।

सुरमई शाम





"आमच्या घरात अजूनही पुरुषप्रधान संस्कृति आहे,
ती राणी आहे आणि मी प्रधान "
प्रसाद शिरगावकर आपला कविता वाचनाचा कार्यक्रम करत होते, खुले घरकुल लौंन, नभीत पूर्ण बहरालेला त्रिपुरी पौर्णीमेचा चंन्द्र, हवेत सुखद हवाहवासा गारवा, मदहोशी धुंदफुंद वातावरण, सोबतीला "ती " (राणी ) , वर परत सुरांची नशा ,


और क्या चाहिये जीने के लिए ?


डी.एस.के नी काल त्यांच्या परिवारातील लोकांसाठी सुरेख मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। खास मुंबई वरुन पुण्याला आलो ते या कार्यक्रमाचे निमित्त घेवुन, डी.एस.के वरील प्रेमापोटी ।
त्यात परत वहिनींचे ( डी.एस.के. यांच्या पत्नी ) एक नवे रूप पाहायला मिळाले। त्यांनी दोन सुरेल भावगीते गायली ।

बहार आली।

Saturday, May 5, 2007

हे त्यांचे विश्व

ज्या शिल्पकारांनी हे विश्व निर्माण केले त्यांच्या नशीबी आखिरतक पत्राच्या घरवजा झोपडीत रहाणे असते, आज येथे तर उद्या कोठे ? देव जाणे !
Posted by Picasa

दिन ढल जाये क़ही रात ना आये

Posted by Picasa

Sunday, April 29, 2007

समस्या रस्ताची


चिनने तिबेटच्या दुर्गम पठारावर अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत रैल्वे लाईन बांधल्याची, अशक्यकोटीतली घटना, प्रत्यक्षात साकारली म्हणे. धायरी गावातुन DSK Vishwa मधे जाण्याच्या वाटेवरील लहानश्या नाल्यावरचा छोटासा पुल गेल्या पावसाळ्यात, पाण्याचा लोंढा आल्यामुळे खचला होता, तेव्हा पासुन नविन पुलाचे सुरु झालेले काम यंदाचा पावसाळाजवळ येत चालला तरी पुरे होण्याचे लक्षण दिसत नाही. धन्य ते बांधणारे आणि धन्य ते आम्ही. ह्याच बरोबर हा संपुर्ण रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. यशाचा मार्ग नेहमी खाचखळगे, खड्या मधुन जातो म्हणे. त्यात भरीस भर म्हणुन रस्तावर रात्री पुरेसा उजेड हि नसतो. रात्रीअपरात्री येताना तसा त्रास सहन करावा लागतो खरे पण आता निसर्गाच्या कुशीतच रहायचे तर हे सारे मुकाट्याने सहन करावयाला हवे नाही का ?

Wednesday, April 11, 2007

मौजेगमसे कोइ ना हो मायूस, जि़दगी डुबकर फिर उभरती है

गेल्या गुरुवारी बऱ्याच दिवसानी मी माझ्या आशियानात परतलो, बे़ख्वाबी विसण्यासाठी, निवांत झोप घेण्यासाठी, ताणतणावापासुन नजात (मुक्‍ती) मिळवण्यासाठी, तीन दिवसाची सुट्टी मजेत, ऐश करीत बितवण्यासाठी.

शुक्रवारी दिवसभर तसे फार गरम होत होते, अचानक सायंकाळी वारे वाहु लागले. वातावरणात सुखदता जाणवु लागली. कोठेतरी वळवाचा पाऊस छिडकावा करीत होता, तपन धरतीला थंडावत.
यही बहार है दुनिया को भुल जानेकी खुशी मनानेकी, ये प्यारे प्यारे नजारे ये थंडी थंडी हवा, ये हल्का हल्का नशा , ये कोयलोंकी सदा, निकलके आ गयी ऋतु मस्तीया लूटानेकी खुशी मनानेकी ( लता, रागरंग, रोशन).

क्या ऩजारा था डुबता हुवे सुरज का. मजा आ गया. (ह्याच ह्याच क्षणासाठी गिरीस्थानावर हजारो रुपये खर्च करुन आपण मनस्ताप भोगायला जातॊ. येथे हे सर्व विनामुल्य आहे . काश हि हवा आपण डबाबंद करुन हवे तेथे नेवु शकत असतो तर ?)

सोमवार आला, मोरु परत आपल्या जागी परतला खर्डेघाशी करायाला, कधीतरी केव्हातरी हे परत उपभोगण्यासाठी.
आमेन.

Friday, March 9, 2007

DIWALI NIGHT


Saturday, February 3, 2007

Saptasur - Saat Suro Ke Saat Hai Zhule

New addition to DSK VISHWA


Saat Suro Ke Saat Hai Zhule, Jo Jhule Wo Sub Dukha Bhule, Tu Ched Sakhi Sargam

Friday, February 2, 2007