
चिनने तिबेटच्या दुर्गम पठारावर अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत रैल्वे लाईन बांधल्याची, अशक्यकोटीतली घटना, प्रत्यक्षात साकारली म्हणे. धायरी गावातुन DSK Vishwa मधे जाण्याच्या वाटेवरील लहानश्या नाल्यावरचा छोटासा पुल गेल्या पावसाळ्यात, पाण्याचा लोंढा आल्यामुळे खचला होता, तेव्हा पासुन नविन पुलाचे सुरु झालेले काम यंदाचा पावसाळाजवळ येत चालला तरी पुरे होण्याचे लक्षण दिसत नाही. धन्य ते बांधणारे आणि धन्य ते आम्ही. ह्याच बरोबर हा संपुर्ण रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. यशाचा मार्ग नेहमी खाचखळगे, खड्या मधुन जातो म्हणे. त्यात भरीस भर म्हणुन रस्तावर रात्री पुरेसा उजेड हि नसतो. रात्रीअपरात्री येताना तसा त्रास सहन करावा लागतो खरे पण आता निसर्गाच्या कुशीतच रहायचे तर हे सारे मुकाट्याने सहन करावयाला हवे नाही का ?