Saturday, November 24, 2007

घराला घरापण देणारी माणसे

"आम्ही आलो, आम्ही पाहिले, आम्ही घेतले. घर घेणे एवढे सोपे होते तर ! मग त्या साठी २०-२२ वर्षे वाट बघण्यात का वाया घालवली ? एकमेव कारण त्या काळी डि.एस.के. विश्व नव्हते हेच असु शकते.
२५ डिसेंबर २००४ चा नाताळात आमच्या साठी सांताक्लॉज भेटवस्तु घराच्या रुपाने घेवुन आला. अनेक वर्षे मी क्रेडीट कार्डाच्या मोहजालात फसुन कर्जबाजारी अवस्थेत गुजारा करत होतो. डोके वर काढायलाही मिळत नव्हते. ऍरीयर्स मिळाले, पहिल्यांदा सर्व कर्जे फेडुन टाकली . दिवाळीत बायकोनी सर्वांसमवेत मसुरीला जाण्याचा बेत आखला, तो टाळण्यासाठी मी तिला खोटेखोटे सांगितले कि मी पुण्यात घर घेण्याचा विचार करतो आहे. (तसा माझा हा विचार अगदी कॉलेज च्या दिवसांपासुनचा होता, पण धीर होत नव्हता ), मला काय ठावुक ती ही कल्पना लगेचच उचलुन धरेल. मसुरीला ही जावु व घर ही घेवु, ही तिची प्रतीक्रिया. बहुतेक आपला नवरा रॉकफेलर आहे असा तीचा गैरसमज असावा. मसुरीवरुन परत आल्यावर पुण्यात घर घेण्याचा विचार बळकवला. एके रविवारी सर्व सगेसोयरे समवेत पुण्याला घर शोधण्याच्या मोहीमेला निघायचे ठरले, नेहमीप्रमाणेच एकएक गळत गेला. आमचा मग मुडच गेला, म्हटले जावु दे नन्नाचाच पाढा , पनवतीच, लागली आहे. आपणही नकोच जावु या. पण नियतीच्या मनात तसे नव्हते. पहाटे चार वाजता अचानक मला जाग आली, बायकोला उठवुन लगेचच पुण्याला निघालो.
त्या आधी दोन एक वर्षे डि.एस.के. विश्व च्या जाहीराती मनाला भुरळ घालत होत्या. घर येथेच घेण्याचे हे मी , जागा न बघताही मनाशी पक्के ठरवले होते. पण दुर कोठे जाणार करुन तीचा विरोध होता. मग मी एक छोटीसी गंमत केली. शिवाजी नगर वरुन जागा पाहाण्यासाठी पाषाण सुस रोड, वगैरे विभागात रिक्षाने फेरफटका मारला. परिसर बघुनच ती नाराज झालेली बघुन हळुच रिक्षा डि.एस.के.च्या कार्यालयाकडे वळवली.
त्यानंतर जे काही झाले ते स्वप्नवतच होते. त्यांच्या गाडीतुन डि.एस.के. विश्व मधे जाणे, प्रथमदर्शनी त्याच्या प्रेमात पडणे, येथला निसर्ग, वारा, मोकळेपणा याचा आस्वाद घेत, घर असावे तर येथेच नाहीतर कुठेच नको याची खुणगाठ मनाशी बाळगत, डि.एस.के.च्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीने सुखावत जावुन, मस्त शेजार निवडत, घर पसंत करणे. मग त्या रात्री अंगावरच्या कपडयानिशी एका नातेवाईकांकडे रात्र गुजारली. दुसऱ्या दिवशी आईवडिलांना चेकबुक घेवुन ,पसंत केलेली जागा दाखवण्यासाठी, व त्यांचा विचार घेण्यासाठी पुण्याला बोलावले. धीर अजिबात धरवत नव्हता, कधी आपल्या मालकीची , हक्काची जागा होते असे झाले होते.
गंमत म्हणजे खिश्यात व खात्यात एकही दमडी पैसा नव्हता. कुठुन तरी ११,००० घेवुन दुसऱ्या दिवशी खात्यात भरले. एका बॅंकेत गृहकर्जासाठी गेलो, पण माझे त्याच बॅंकेत खाते असले तरी, व पगार तेथेच जमा होत असतांना सुद्धा, बचत खात्यात तुमची बचत नाही, सांगत त्यांनी कर्ज देण्यास नकार दिला, पगारातुन परस्पर जिवन विमा, ऐच्छीक प्रोव्हीडंड फंड मधे मी मोठी गुंतवणुक करत आहे हीच माझी बचत, या युक्ती वादावर बाईचा विश्वास नव्हता. निराश मनाने मी काय करावे याचा विचार करु लागलो, हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळतो की काय ? अर्थात शेवटचा फंडा तुन पैसे उचलणे हा पर्याय उपलब्ध होता, पण. डि.एस. के.च्या कार्यालयातुन दुरध्वनी आला, ताबा केव्हा घेता याची चौकशी करण्यासाठी, त्यांना मी परिस्थीती सांगीतली. त्यांनी धीर देत मला सर्व कागदपत्रे त्यांना फॅक्स करायला सांगीतले. आयसीआयसीय बॅंक माझ्या साह्यास आली, ह्या बॅकेमधुन मला त्यांनी गृहकर्ज मिळवुन दिले. आणि अश्या रितीने नाताळात आम्ही गृहप्रवेश केला. आयुष्यभरचे स्वप्न साकार केल्या बद्दल डि.एस.के व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. "

2 comments:

  1. ह्याच डीएसके-विश्वमध्ये माझाही एक प्लॉट आहे, पण तो विकत घेतानाचा माझा अनुभव काही चांगला नव्हता. एकतर त्यांच्या ऑफ़िसमधले बरेचसे कर्मचारी अतिशय उद्धट आहेत, सकाळी १० ला बोलावून त्यांनी २:३० पर्यंत तिष्ठत ठेवलं - कागद अजून टाईप होत आहेत, असं सांगून. कागद तयार झाल्यावर ते मला न दाखवता मामलेदाराच्या कचेरीत जायची घाई सुरु केली, की ते साहेब ५:३० पर्यंतच असतात. ते खरेदीखताचे कागदपत्र तिथे नेण्यापूर्वी मला वाचायला मिळावेत यासाठी मला अक्षरश: बाचाबाची करावी लागली. पण त्याचा फ़ायदाच झाला कारण सायंताराच्या जाहिरातीसाठी बनविलेली पाम्प्लेट्स आणि सातबाऱ्यावरचा नकाशा जुळत नव्हते! जो प्लॉट मला टेकडीच्या माथ्यावर आहे म्हणून पाहिजे होता तो खऱ्या नकाशात तर टेकडीच्या मध्यावर - जवळजवळ पायथ्याशी होता! प्रती स्क्वेअर फ़ूटाने पैसे देत असताना, सातबाऱ्यावर क्षेत्रफ़ळ जेवढे आहे त्यापेक्षा गुणाकारात जास्तीचा आकडा घेतलेला होता! प्लॉटचा नकाशा अपेक्षेप्रमाणे नसल्याने मी सही करणार नाही म्हटल्यावर जो गहजब केला की बास. पण मीही चिकाटीने लढले! माझ्या मताप्रमाणे सगळं करून घेतल्यामुळे संध्याकाळी पुन्हा ऑफ़िसात गेल्यावर सगळे इतके माझ्यावर चिडलेले दिसत होते की एक अधिकारी बाई तर माझ्यावर ओरडूनच बोलत होत्या. मी मात्र मनातून खूष असल्याने संयम न सोडता, पण तिला न घाबरता उरलेली प्रोसिजरही पार पाडून बाहेर पडले! डी.एस.के. किंवा वहिनी भेटल्या तर सांगा त्यांना माझ्या अनुभवाबद्दल. ;-)

    ReplyDelete
  2. Amamika,

    Well I had very good experiance of the staff at the time of purchase.

    Frankly speaking I did not checked any of the documents and signed blindly . Througtout my life I have suffereed a lot for not having own house and the excitement of owning the house, override all other things.

    But later on I came to know the actual flat area is less than what was shown in the agreement, also we had paid Rs.10,000.00 to DSK against maintaince chgs and the balance amt was to be returned after society formation. Even after 2 years , I have not yet recd rs. 7000.00 back.

    But again I am overlooking it cause of emotions.

    I do not know DSK of Vahini personally.

    ReplyDelete